“न भुतो न भविष्यती अशी कामगिरी आम्ही मुलमध्ये उभी केली आहे. भविष्यातील सर्वंकष विकासासाठी मुलच्या विजयाची आवश्यकता आहे,” असा ठाम विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
मुल शहरातील गांधी चौकात नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला मुलवासीयांनी दाखवलेली उत्स्फूर्त, ऐतिहासिक व उसळलेली गर्दी ही जनसमर्थनाची स्पष्ट साक्ष ठरली.

Related News
“मुलच्या विकासासाठी मतदारांचा मतरूपी आशीर्वाद आवश्यक” — मुनगंटीवार
जाहीर सभेत बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले,“मुल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही केलेल्या आणि पुढे करणार असलेल्या कामांच्या आधारेच मतांची विनंती करतो. कोणत्याही खोट्या आश्वासनांना किंवा भावनिक भूलथापांना बळी न पडता मुलच्या खऱ्या विकासासाठी मतदान करा.”नगरपरिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘प्रगतीचा वचननामा’ चे उद्घाटनही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.सभेला उपस्थित झालेली प्रचंड गर्दी पाहून,“हा केवळ प्रचार कार्यक्रम नसून मुलच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा ठाम निर्धार आहे. विजयाची खात्री आजच मिळाली आहे,” असे मुनगंटीवार म्हणाले.
10 वर्षांत विकासाची यशस्वी वाटचाल
आमदार मुनगंटीवार यांनी केलेल्या ठोस कामांची यादी त्यांनी या प्रसंगी मांडली –
मुख्य रस्त्यांचे उन्नतीकरण
आकर्षक इको पार्क
अत्याधुनिक स्टेडियम व जलतरण तलाव
आदिवासी वसतिगृह
व्यायामशाळा व पत्रकार भवन
कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृह
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय
तहसील व पंचायत समिती नवी इमारत
कृषी महाविद्यालय, बसस्टँड, आठवडी बाजार
सुसज्ज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज संकुल
100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर
मुल पॉलिटेक्निक कॉलेज मंजूर
नवीन पोलीस स्टेशन, ओव्हरब्रिज
पट्टे वितरण मोहीम
रेस्ट हाऊस आणि योगाभवन
या प्रकल्पांमुळे मुल शहराच्या विकासाचा पाया अधिक मजबूत व भक्कम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
“जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका”
मतदारांना प्रामाणिक आवाहन करताना मुनगंटीवार म्हणाले,“शहरातील विकास कामे न पाहता जातीच्या आधारावर मतदान झाले, तर त्या शहराचे भविष्य कोण सुधारू शकत नाही. विकासाला मतदान करा.”
नगरपरिषदेत तूट भरून काढण्यास मदत
मुल नगरपरिषदेत 5 कोटी 17 लाख 14 हजार 485 रुपये एवढी तफावत असून, ती राज्य सरकारकडून मंजूर करून देण्यात स्वतः पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.“यामुळे गेल्या दहा वर्षांत मालमत्ता कर वाढवावा लागला नाही. मुलच्या नागरिकांच्या सेवेसाठी मी नेहमी तत्पर आहे,” असे ते म्हणाले.
उत्साहात निवडणूक शुभारंभ — विकासपर्वाची नांदी
गांधी चौकात झालेल्या जाहीर सभेनेच निवडणूक वातावरणाला शिगेला नेले असून, मुल शहर उज्ज्वल विकासपर्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
