मुख्याधिकाऱ्यांच्या गैर कामाची चौकशी साठी आमरण उपोषण

मुख्याधिकाऱ्यांच्या

तेल्हारा – नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र सुईवाल यांनी ८ सप्टेंबरपासून नगरपरिषद समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पाचव्या दिवशीही प्रशासनाची दुर्लक्षामुळे शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.सुईवाल यांनी सांगितले की, शहराचा विकास ठप्प असून नाल्या कचऱ्याने भरलेल्या आहेत, रस्ते दुरुस्थितीत नाहीत, स्वच्छतागृह नाहीत, विद्युत पोलवर लाईट नाहीत आणि नगरपरिषदला मिळणारा निधी कुठे जातो, याचा प्रश्न निर्माण होतो. तसेच अतिक्रमण काढताना छोटे व्यावसायिक भेदभावाला सामोरे जात आहेत, जे चुकीचे आहे.सुईवाल यांनी जिल्हाधिकारी अकोला, पोलिस अधीक्षक अकोला आणि तहसीलदार तेल्हारा यांना भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराची तक्रार केली, तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मुख्याधिकारी नगरपरिषदाचे प्रतिनिधी उपोषण स्थगित करण्यासाठी आले, मात्र त्यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.सुईवाल यांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरू आहे, आणि अनेक नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. नागरिक आणि उपोषणकर्ते मागणी करत आहेत की, नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा प्रशासन सर्व जबाबदार असेल.उपोषण स्थळावर नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत चिंता व्यक्त केली असून, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांना या घटनेची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे, असे उपोषणकर्त्यांबरोबर पाठिंबा देणाऱ्यांनी स्पष्ट केले.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/akolyache-sarpamitra-58-divasachi-squad/