मुंबई | प्रतिनिधी
चित्रपट अभिनेता आर. माधवन यांनी शालेय इतिहास पुस्तिकांतील असंतुलित अभ्यासक्रमावर नाराजी व्यक्त करत
केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “मुगलांवर आठ
Related News
धडे आणि चोल साम्राज्यावर फक्त एक धडा का?” असा थेट सवाल माधवन यांनी एका मुलाखतीत केला आहे.
इतिहास कोण ठरवतं? — माधवन यांचा सवाल
नुकताच प्रदर्शित झालेला “केसरी २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग” या ऐतिहासिक चित्रपटातून चर्चेत आलेले
माधवन यांनी न्यूज18 शोशा या प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत आपल्या शालेय अभ्यासक्रमातील विसंगती मांडली.
त्यांनी सांगितले की,
“माझ्या शालेय जीवनात मुगांलांवर आठ धडे होते, ब्रिटिशांवर चार, हरप्पा-मोहनजोदडोवर दोन आणि चोल,
पांड्य, पल्लव, चेर या दक्षिण भारतातील समृद्ध साम्राज्यांवर मिळून फक्त एकच धडा होता.“
चोल साम्राज्याचा गौरव इतिहास दुर्लक्षित का?
माधवन यांनी चोल साम्राज्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वावर भर देत म्हटलं की,
“चोल साम्राज्य २४०० वर्ष चाललं. त्यांच्या व्यापार मार्गांनी रोमपर्यंत पोहोचलं होतं, तर धार्मिक प्रभाव कोरियातही होता. तरीसुद्धा फक्त एकच धडा?“
त्यांनी दक्षिण भारताच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलं जातंय, असं ठामपणे नमूद केलं.
एनसीईआरटी वाद आणि नवा अभ्यासक्रम
माधवन यांच्या या वक्तव्याची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण एनसीईआरटीने अलीकडेच
इयत्ता ७वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून ‘मुगल साम्राज्य’ आणि ‘दिल्ली सल्तनत’ संदर्भ वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
याऐवजी ‘मेक इन इंडिया’, ‘बेटी बचाओ’ यांसारखे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.
या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हे “इतिहास पुसण्याचा प्रयत्न”
म्हणून टीका केली, तर काहींनी समर्थन केलं आहे.
‘केसरी २’मधील ऐतिहासिक सत्यतेवरही भाष्य
‘केसरी चैप्टर २’ या चित्रपटावरही काही वर्गांकडून इतिहासाच्या सादरीकरणावर टीका झाली. यावर उत्तर देताना माधवन म्हणाले,
“इतिहासाचं सत्य मांडल्याबद्दल आम्हाला दोष देऊ नका. जर इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असेल, तर तो दुरुस्त करणं गरजेचं आहे.“
“आपण कोण ठरवतो?” – स्व-ओळखीचा प्रश्न
माधवन पुढे म्हणाले,
“सिलेबस कोण ठरवतं? हा कोणाचा दृष्टिकोन आहे? तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे,
पण याबद्दल कोणाला काही माहीतच नाही. आपल्या संस्कृतीत असलेलं वैज्ञानिक ज्ञान आजही उपहासास पात्र होतंय.“
आर. माधवन यांचे हे वक्तव्य केवळ एका अभिनेत्याचे मत नसून, भारतीय इतिहासातील समतोल दृष्टिकोनाची गरज
अधोरेखित करणारा आवाज आहे. शिक्षण धोरणात बदल करताना संपूर्ण भारताच्या
वैभवशाली इतिहासाला समान महत्त्व देणं हे काळाची गरज आहे, असं म्हणता येईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/kedarnath-dhamche-door-bhavikanasathi-opened/