Mr. & Miss Vidarbha 2026 : विदर्भातील नव्या टॅलेंटचा भव्य उत्स

Mr. & Miss Vidarbha

Mr. & Miss Vidarbha 2026 : विदर्भातील नव्या टॅलेंटचा भव्य उत्सव

विदर्भातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या Mr. & Miss Vidarbha 2026 या भव्य सौंदर्य व व्यक्तिमत्त्व स्पर्धेने यंदा नव्या टॅलेंटचा झगमगता ठसा उमटवला. किड्स, टीन तसेच प्रौढ कॅटेगरीतील स्पर्धकांनी आत्मविश्वास, मेहनत आणि सादरीकरणाच्या जोरावर मंच गाजवला.

किड्स कॅटेगरीत समाई उमाळेचा दबदबा

किड्स कॅटेगरीत उत्कृष्ट कामगिरी करत समाई उमाळे याने Kids Winner – Mr. & Miss Vidarbha 2026 हा मानाचा किताब पटकावला. लहान वयातच आत्मविश्वास, प्रभावी स्टेज प्रेझेन्स आणि निरागस सादरीकरणामुळे समाईने परीक्षकांसह प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, या मंचाने नवोदित बालकलाकारांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related News

मानाचे किताब व विशेष सन्मान

या स्पर्धेत प्रणव मिसाळ याला Mr. 2nd Runner-Up, तर आरोही जैन हिला Miss Vidarbha 1st Runner-Up हा मान मिळाला.
राजेश्वरी सरबुकन हिला Show Opener चा बहुमान मिळाला, तर वैष्णवी कापले हिने Showstopper हा किताब पटकावून विशेष दखल घेतली.

टीन कॅटेगरीत रिद्धी व भाव्याची बाजी

टीन कॅटेगरीत उत्कृष्ट सादरीकरण करत रिद्धी देशमुख हिने Miss Teen Vidarbha 2026, तर भाव्या नाईक याने Mr. Teen Vidarbha 2026 हा बहुमानाचा किताब जिंकला. आत्मविश्वास, टॅलेंट, मेहनत आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर दोघांनीही परीक्षकांचे लक्ष वेधले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शो टॉपर व इतर विजेते

स्पर्धेतील सातत्यपूर्ण आणि दमदार सादरीकरणामुळे अभिनव अवसरमोल याने Show Topper – Mr. Vidarbha 2026 हा मानाचा किताब पटकावला.
तसेच, स्मिता मल्होत्रा हिने Miss 2nd Runner-Up – Mr. & Miss Vidarbha 2026 हा किताब मिळवत आपल्या ग्रेसफुल वॉक व प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली.

फिटनेस क्षेत्रातील सन्मान

विदर्भातील फिटनेस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत यशराज राऊत यांना Best Fitness Award of Vidarbha 2026 ने सन्मानित करण्यात आले. शिस्तबद्ध जीवनशैली, सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रेरणादायी प्रवासामुळे त्यांनी हा बहुमान मिळवला असून, अनेक तरुणांना फिटनेसकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे.

Apex Media चे मोलाचे योगदान

Mr. & Miss Vidarbha 2026 च्या यशस्वी आयोजनामागे मार्केटिंग पार्टनर Apex Media यांचे मोलाचे योगदान लाभले. गेल्या दोन महिन्यांच्या संपूर्ण तयारीदरम्यान Apex Media टीमने दिलेले उत्कृष्ट नियोजन, सर्जनशीलता आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच हा कार्यक्रम भव्य आणि यशस्वीरीत्या पार पडला. आयोजकांकडून संपूर्ण Apex Media टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

एकूणच, Mr. & Miss Vidarbha 2026 ही स्पर्धा केवळ सौंदर्यापुरती मर्यादित न राहता आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व, मेहनत आणि नव्या टॅलेंटला योग्य दिशा देणारा प्रेरणादायी मंच ठरली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/dmart-employee-benefits-10-amazing-benefits-of-dmart-job-compared-to-it-it-is-more-powerful-and-beneficial/ 

Related News