माउंट एव्हरेस्टवर गोठला कचरा; ११ टन कचरा उचलला

जगातील

जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवरील

सर्वाधिक उंचीवरील कॅम्पजवळ कचऱ्याचा ढीग असून,

तो साफ करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात.

Related News

एव्हरेस्ट शिखराजवळील कचरा साफ करणे आणि वर्षानुवर्षे गोठलेल्या अवस्थेतील

मृतदेह खणून काढण्याचे काम करणाऱ्या एका पथकाचा प्रमुख असलेल्या शेर्पाने ही माहिती दिली.

नेपाळ सरकारने निधी दिलेल्या आणि सैनिक व शेर्पाचा समावेश असलेल्या

एका पथकाने ११ टन कचरा, चार मृतदेह

आणि एक सांगाडा एव्हरेस्ट परिसरातून या मोसमात उचलला.

या पथकाचे नेतृत्व अंग बाबू शेर्पा यांनी या पथकाचे नेतृत्व केले.

एव्हरेस्ट शिखरावर चढाईसाठी शेवटचा कॅम्प असलेल्या साउथ कोल

या परिसरात अजूनही ५० टन कचरा असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘कचऱ्यामध्ये प्रामुख्याने जुने तंबू, अन्नाची पाकिटे, गॅस कार्टिज,

ऑक्सिजन बाटल्या, चढाई आणि तंबूउभारणीसीठी वापरले जाणारे दोर यांचा समावेश आहे.

हा कचरा आठ हजार मीटर उंचीवर साउथ कोल कॅम्पच्या जवळ अनेक थरांमध्ये,

गोठलेल्या स्वरूपात आहे,’

असे त्यांनी सांगितले.

१९५३ मध्ये सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर सर्वप्रथम चढाई करण्यात आली.

तेव्हापासून हजारो गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून

आपल्या पाऊलखुणांपेक्षा खूप काही तिथेच सोडले आहे.

गिर्यारोहकांनी आपला सर्व कचरा परत आणावा

अन्यथा त्यांची अनामत रक्कम जप्त होईल,

असा बडगा नेपाळ सरकारने अलिकडेच उगारला आहे.

गिर्यारोहकांमध्येही जागरुकता वाढीला लागली आहे.

त्यामुळे आता कचऱ्याचे प्रमाण कमी झाले असले,

तरी आधीच्या दशकांमधील परिस्थिती अशी नव्हती.

यातील बहुतांश कचरा जुन्या मोहिमांदरम्यानचा असल्याचे अंग बाबू यांनी सांगितले.

Read also: https://ajinkyabharat.com/hare-ram-hare-krishna/

Related News