माऊली श्री ज्ञानोबारायांच्या ७५०व्या जयंती निमित्त नियोजन सभा संपन्न

माऊली श्री ज्ञानोबारायांच्या ७५०व्या जयंती निमित्त नियोजन सभा संपन्न

माऊली श्री ज्ञानोबारायांच्या ७५०व्या जयंती महोत्सवानिमित्त आकोटात नियोजन सभा संपन्न

आकोट –
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने

माऊली श्री संत ज्ञानोबारायांची ७५० वी जयंती राज्यभर भव्यदिव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार गोकुळ अष्टमी, दिनांक १५ ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची भव्य पालखी मिरवणूक संपूर्ण राज्यात निघणार आहे.

या पार्श्वभूमीवर आकोट नगरपरिषदेतर्फे दिनांक ७ ऑगस्ट रोजी नियोजन बैठक घेण्यात आली.

या बैठकीत श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट यांना प्रमुख निमंत्रित करून मिरवणुकीचा आराखडा ठरविण्यात आला.

मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी पालखी सोहळ्याचे नियोजन व जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन संस्थेला केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री वासुदेवराव महाराज महल्ले यांनी ही सेवा स्वीकारत पताकधारी, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, श्रींचा रथ, साऊंड रथ अशा सर्व सेवा संस्थेतर्फे देण्याची घोषणा केली.

यापूर्वी, दिनांक ९ ऑगस्ट रोजी श्रद्धासागर येथे माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक व भक्त मंडळींची तातडीची सभा भरवण्यात आली होती.

यात जयंती महोत्सव भव्य, दिव्य व आनंदमय पद्धतीने साजरा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

प्रत्येक प्रभागातून पालखी सोहळ्यास स्वागत व सक्रिय सहभाग मिळावा, तसेच विविध गावांच्या दिंड्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

नगरपरिषद आकोटेतर्फे ११ ऑगस्ट रोजी झालेल्या आढावा बैठकीत पोलीस, तहसील, आरोग्य, स्वच्छता व अतिदक्षता विभागांमार्फत आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.

या बैठकीस श्री संत नरसिंह महाराज संस्थानचे अध्यक्ष सतीश आसरकर, माजी नगरसेवक पुरुषोत्तमभाऊ चौखंडे, विवेकभाऊ बोचे,

मनीषभाऊ कराळे, मंगेशभाऊ लोणकर, रविभाऊ केवटी, प्राचार्य डॉ. सुनील पांडे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर, सहसचिव अविभाऊ गावंडे, तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य मिरवणुकीत गावोगावीचे संतवेडे, भजन मंडळे, पताकधारी व दिंड्या सहभागी होऊन उत्सवाचे वैभव वाढवतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

READ ALSO :http://ajinkyabharat.com/american-bla-best-pakistan/