अकोट : तालुक्यात मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता वन्य प्राण्यांचा त्रासही शेतकऱ्यांच्या डोक्याला भेडसावत आहे. मौजे ढगा शिवारासह तालुक्यातील अनेक भागांत हरीण, डुक्कर, माकड यांसारख्या वन्य प्राण्यांमुळे उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत.शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आधीच अस्मानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आता वन्यजीवांचा तडाखा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असून शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी वाढू लागली आहे.सध्या महसूल विभागाच्या वतीने पिकांचे नुकसान पाहणी व सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, वन्यजीव विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे, तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/the-primary-of-the-primary-shadow-the-welcome-and-the-unmarried-samarmbha/
