अडाणनदीतून वाहत जाणाऱ्या अनोळखी मृतदेहाचा शोध सुरु
कारंजा (लाड) : शिवणी गावा जवळील पुलावरून अडाणनदीच्या प्रवाहात वाहत जाणारा अनोळखी मृतदेह दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपातकालीन शोध व बचाव पथकाने त्वरित सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.मंगरूळपीर तहसीलदार रवींद्र राठोड व पोलीस स्टेशनचे पिएसआय ज्ञानेश्वर धावळे यांनी तातडीने शोध पथकाला पाचारण केले. काल दुपारी चार वाजता सुरू झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये खडी धामणीपर्यंत शोध घेतला असला तरी अद्याप मृतदेह सापडलेला नाही.अडाणनदीमध्ये मोठा पुर असल्याने पाण्याचा प्रवाह खूप जोरात असल्यामुळे शोधकार्याला अडथळे निर्माण होत आहेत. आज १७ सप्टेंबर सकाळी अडाण धरण ते उलटे शिवणी पर्यंत पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु आहे.सर्च ऑपरेशनमध्ये आ.व्य.अ.शाहु भगत यांनी आढावा घेतला तर पोलीस आणि रेस्क्यू पथकाचे अधिकारी – ठाणेदार कीशोर शेळके, पिएसआय ज्ञानेश्वर धावळे, पो.का. रमेश जाधव, संजय घाटोळे, प्रमोद थोरवे, नितीन रवणे, वाहन चालक उमेश ठाकरे आदी सहभागी आहेत.
