ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत
उरळ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध, गावरान चा मुद्देमाल जप्त !
उरळ पोस्टेच्या हाद्दीमधील सर्व हात भट्टीवर कारवाईचा सपाटा चालु केला आहे पोलीस अधीक्षक,
अकोला यांचे संकल्पनेतून प्रहार मिशन अंतर्गत व निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे
समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे
दि.०६ रोजी उरळ पोलिस स्टेशन हृददीत ग्राम निंबा येथे शासकीय वाहना सोबत ठाणेदार पंकज कांबळे,
एम. डी. खान पो.शी.नागेश बाबुळकर, चालक पोकॉ.शुभम बोडके गस्त करत असताना ठाणेदार यांना फोनवरून
गोपनीय माहिती मिळाली की, ग्राम निंबा येथे एक इसम अवैधरित्या गावरान हातभट्टीची दारू विकत आहे अशा माहितीवरून
तेथील दोन पंचांना माहिती सांगून सोबत घेवून मिळालेल्या माहितीप्रमाणे तेथे पाहणी केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे नारायण
शालीकराम डाबेराव हा त्याचे राहते घराच्या मागच्या बाजूला लागून वाडग्यात गावरान हातभट्टीची दारू विक्री करीत असताना
दिसला वरून त्यास ताब्यात घेऊन त्याला पंचासमक्ष त्याचे नाव विचारले असता,
त्याने त्याचे नाव नारायण शालिग्राम डाबेराव , वय ६२वर्ष रा.निंबा ता.बाळापुर जि अकोला असे सांगितले.
त्याच्या जवळील एका प्लॅस्टिक कॅनमध्ये गावरान हातभट्टीची १० लिटर दारू किंमत अंदाजे २०००रु ची मिळून आली तसेच वाडग्यात कुंपणा
मध्ये झाकून ठेवलेले २२ टीनाचे पिपे मिळून आल्याने पंचासमक्ष पाहणी केले असता त्यामध्ये मोहळाचा सडवा
असा १५ लिटर पिपा प्रत्येकी प्रमाणे ३३० लिटर मोहळाचा सडवा असा ३३००० रू. असा एकूण ३५०००रुपये चा मुद्देमाल त्याच्याजवळ आढळून आला.
तो पंचासमक्ष जप्त केला. मुददेमालासह पोलीस स्टेशन ला आरोपी नामे नारायण शालिग्राम डाबेराव वय ६२ वर्ष रा. निंबा , ता. बाळापुर जिअकोला
याला ताब्यात घेऊन कलम ६५ ई महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखलं करण्यात आला.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित साहेब चांडक अपर पोलीस अधीक्षक चद्रकांत रेड्डी
,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पो.स्टे उरळ ठाणेदार एपीआय पंकज कांबळे ,
एम. डी. खान नागेश बाबुळकर, चालक शुभम बोडके,महीला पोलिस शिपाई मनाली आडे यांनी केली आहे.