मंगरुळपीरमध्ये उत्साहात साजरा; पारंपरिक नृत्याने रंगली बंजारा संस्कृती
बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा तिज उत्सव मंगरुळपीर येथे उत्साहात साजरा झाला.
पारंपरिक वेशभूषेत महिलांनी फेर धरून नृत्य सादर केले व समाजबांधवांनी आनंद व्यक्त केला.
या उत्सवात दहा दिवसांपूर्वी अविवाहित मुली टोपलीत ‘गौरी स्वरूप’ धान (गहू) पेरतात व दररोज आराध्य देवतांची गीते म्हणत पूजा केली जाते.
विसर्जनाच्या दिवशी महिलांनी वाजतगाजत डोक्यावर ‘गौरीस्वरूप धान’ घेऊन तांड्याला प्रदक्षिणा केली.
श्रावण महिन्यातील हा सोहळा म्हणजे बंजारा समाजाची “दिवाळी” मानला जातो.
लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरी येऊन या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे या परंपरेला वेगळे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही तिज उत्सवात मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव व भगिनींची उपस्थिती होती.
मातृशक्तीला वंदन करणारा आणि “गण गौर” परंपरेचे महत्व अधोरेखित करणारा हा उत्सव विविधतेत एकतेचे प्रतीक ठरला.
Read also : https://ajinkyabharat.com/darroj-fakt-100-rupees-retint-kotyavadhi-rupaycha-fund/