मच्छर निर्मूलनासाठी चिंचखेड खुर्द गावात व्यापक फवारणी अभियान

मच्छर

लोहारी चिंचखेड येथे विश्वशांती बुद्ध विहार समिती ट्रस्ट चिंचखेड खुर्दच्या वतीने आणि उपसरपंच श्री प्रदीप किसनराव सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छर निर्मूलन धुवारणी करण्यात आली.पावसाळ्यात साथीचे रोग व मलेरियाचा प्रसार टाळण्यासाठी तिन्ही गावांमध्ये प्रभावी फवारणी आणि धुवारणी केली गेली. वैभव वानखडे, आकाश सपकाळ, सूरज सपकाळ यांनी धुवारणीचे काम केले, तर शुभम म्हैसने, जनार्दन ठाकरे, रघुनाथ म्हैस, भानुदास म्हैस आणि शरद गावंडे यांनी सक्रिय सहकार्य केले.संपूर्ण अभियानाद्वारे ग्रामस्थांना पावसाळ्यात घराभवती स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/tisya-divashi-malegava-polys-stationla-gunha-prayers/