मूकबधिर मुलांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

कर्णबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अकोट:जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधून स्व. मोतीरामजी चिंचोळकर मूकबधीर विद्यालय (निवासी) अकोट येथील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजातील मूकबधिर विद्यार्थ्यांना इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षण देऊन समाजप्रवाहात आणण्याचे कार्य हे विद्यालय सातत्याने करत आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात आनंदाचे क्षण निर्माण करण्याच्या हेतूने रोटरी क्लबने हा उपक्रम राबविला. या अंतर्गत विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, रंगपेटी, मिष्टान्न यांसह अध्ययनासाठी उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम अध्यक्ष रोटे. रवि पवार, राजकुमार गांधी, उध्दव गणगणे, संतोष इस्तापे, श्याम शर्मा, शिरीष पोटे, दीपक कतोरे, नावेश मोहता यांच्या हस्ते पार पडला. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या प्रसंगी रोटे. राजकुमार गांधी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लब ऑफ अकोट भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या वेळी प्र.मुख्याध्यापक जयदीप राऊत, मच्छिंद्र नागरे, अक्षय भागवत, संतोष चिंचोळकर, वेद राजगुरू, प्रविण चांदूरकर, दीपक कवदे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

read also:https://ajinkyabharat.com/come-honar-district-representation/