‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;

‘मोनिका ओ माय डार्लिंग’... ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम; फिटनेस व्हिडिओ पाहून थांबेल श्वास!

बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,

पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही

हेलेन यांनी अशी अदा दाखवली आहे की, चाहते पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमात पडले आहेत.

Related News

गुजरे जमानेत ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, ‘पिया तू अब तो आजा’ यांसारख्या गाण्यांतून आपले ठसकेबाज

ठुमके दाखवणाऱ्या हेलेन यांनी त्या काळातील प्रेक्षकांवर मोहिनी घातली होती.

आजही त्यांचा ग्लॅमर आणि एनर्जी पाहून तरुण कलाकारही थक्क होतात.

सध्या सोशल मीडियावर हेलेन यांचा एक फिटनेस व्हिडिओ व्हायरल होत आहे,

ज्यात त्या पिलाटे एक्सरसाइज आणि ट्रॅम्पोलिनवर उड्या मारताना दिसत आहेत.

त्यांच्या या उत्साहपूर्ण हालचाली पाहून अनेक चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

नेटिझन्स म्हणतात :

– “८६ वर्षातही इतकी ऊर्जा? प्रेरणादायक!”
– “हेलेनजी म्हणजे खऱ्या अर्थाने फिटनेस आयकॉन!”
– “उत्साह आणि स्टाइलचा मिलाफ म्हणजे हेलेन!”

वय काहीही असो, जर मन तरुण असेल तर शरीर त्याचा साथ देते,

हे हेलेन यांनी पुन्हा सिद्ध केले आहे. त्यांच्या फिटनेसच्या या नव्या झळकतेमुळे त्या नव्या पिढीसाठीही एक प्रेरणा बनल्या आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/12th-napas-pan-mothmothiya-websites-hak-karanare/

Related News