अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. जळगावात मोदींच्या
उपस्थितीत लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
Related News
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
आहे. या कार्यक्रमात राज्यातील ११ लाख महिलांना प्रमाणपत्रं दिली जाणार
आहेत. यापैकी काही महिलांना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र दिली जातील.
महाराष्ट्रातील व देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर विमानतळावर
महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केलं आहे. याअंतर्गत मविआ
कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर निषेध आंदोलन केलं.
मात्र, पोलिसांनी अंबादास दानवे आणि मविआ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे
आंदोलन थांबवलं आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी नगर
येथे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी दानवे
यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. हे कार्यकर्ते
विमानतळ परिसरात दाखल झाले होते. यापैकी बहुसंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी
ताब्यात घेतलं असून उर्वरित कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर मानवी साखळी तयार
केली होती. तसेच अनेकांच्या हातात बदलापूरमधील घटनेचा निषेध नोंदवणारे
पोस्टर्स होते. काळे कपडे परिधान करून हे आंदोलक विमानतळाबाहेर उभे ठाकले
होते. मात्र पोलीस आता आंदोलकांना तिथून घेऊन गेले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/situation-of-tension-in-israel-after-hezbollah-attack/