मोदीजी, आता तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा सवाल

लोकसभा

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने आता

विधानसभा निवडणूक 2024 साठी रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीने

आज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली.

Related News

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिलं भाषण करत,

मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये  जोष भरला. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?

पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो,

असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविआ म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर सेक्युलर सिव्हिल कोडवरुन टीकास्त्र सोडलं.

मोदींनी लाल किल्ल्यावरुन सेक्युलर सिव्हिल बिलाबाबत भाष्य केलं.

आता तुम्हाला सेक्युलर शब्द आठवला म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का?

असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्राबाबू,

नितीश कुमारांच्या मांडीला मांडी लावून बसलात, मग तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का?

मग उगाच आगी लावण्यासाठी म्हणून वक्फ बोर्डाचं विधेयक आणलंत.

जर आणलं असेल तर बहुमताच्या जोरावर ते मंजूर का केलं नाही? असा सवाल उद्धव यांनी विचारले.

Read also: https://ajinkyabharat.com/vinesh-phogatwar-pm-modis-big-statement/

Related News