राहुल गांधींचा हल्लाबोल..
लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरत आहे.
विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.
अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल म्हणतात, “मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर असून,
आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने संविधानावर केलेला हल्ला आम्हाला मान्य नाही
आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.
प्रबळ विरोधक म्हणून आम्ही दबाव कायम ठेऊ आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळू देणार नाही.”
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या 15 दिवसातील
महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला.
“एनडीएचे पहिले 15 दिवस ! 1- भीषण रेल्वे अपघात. 2- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले
3- ट्रेनमधील प्रवाशांची दुर्दशा. 4- NEET घोटाळा. 5- NEET PG रद्द
6- UGC NET चा पेपर लीक. 7- दूध, डाळी, गॅस, टोल महाग.
8- जळणारी जंगले. 9- जलसंकट. 10- उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे मृत्यू,”
अशी टीका राहुल यांनी केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे
पीएम मोदींवर जोरदार टीका केली.
“मोदीजी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काहीतरी बोलतील,
अशी देशाला आशा होती. NEET आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटीवर बोलतील,
अशी आशा होती.
पण, त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही.
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले.
मणिपूर गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे,
पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांच्या आजच्या भाषणात
हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली नाही.
आसाम आणि ईशान्येत पूर येऊ शकतो, महागाई वाढू शकते,
रुपयाची घसरण होऊ शकते, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा आणि जात जनगणना,
अशा कोणत्याही मुद्द्यावर मोदीजी पूर्णपणे मौन बाळगून होते,” अशी टीका त्यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/eknath-shindeni-kolhapur-tour-canceled-banana/