“मोबाईलमध्ये कैद ! प्रेमप्रकरणातून डोंबिवलीत आत्महत्या”

“11व्या मजल्यावरची शेवटची उडी – प्रेमकथा धोक्यात”

डोंबिवली (ठाणे) : प्रेमप्रकरणात अपयश आलेल्या एका तरुणाने धक्कादायक पाऊल उचलले. डोंबिवली पश्चिम भागातील सुदामा इमारतीत 11व्या मजल्यावरून उडी मारून ऋषिकेश परब (वय अंदाजे २०) याने आपले प्राण संपवले. ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून शहरात शोककळा पसरली आहे.माहिती नुसार, मृतक ऋषिकेश परब उमेश नगर येथील सुदामा इमारतीमध्ये सहा मजल्यावर कुटुंबासोबत राहत होता. तो डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिकत असताना एका सहविद्यार्थिनीशी ओळख झाली आणि काही महिन्यांनंतर प्रेमप्रकरणात दोघांमध्ये वाद सुरू झाला. शनिवारीही वाद झाल्याचे समोर आले. यानंतर ऋषिकेशने मोबाईल घरात फेकून, 11व्या मजल्यावरील डकमध्ये जाऊन बसले. सकाळी ८ वाजल्यापासून तो तिथे बसून होता.सकाळी 11.50 वाजता घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र, 12 वाजता ऋषिकेशने उडी मारली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी या घटनेची माहिती दिली.प्रेयसीसोबत झालेल्या वादामुळे या तरुणाने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे डोंबिवली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे

read also : https://ajinkyabharat.com/motha-decision-ghyayachaya-tayarit-laxman-hakemaratha-reservation/