भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून
उमेदवारांची यादीच जाहीर होताना पाहायला मिळत आहे.
Related News
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
आजोबा-पणजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणाचा किती हक्क? वडिलांनी नाकारला तर काय करावे?
आजोबा-पणजोबांच्या संपत्ती : भारतातील कौटुंब...
Continue reading
शेअर बाजार कोसळला: 4 लाख कोटींचे नुकसान, गुंतवणूकदारांमध्ये घाबराट
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 850 अंकांन...
Continue reading
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटक
पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक...
Continue reading
धुळे: शिरपूर तालुक्यात आईने दोन मुलांसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना; एकाच वेळी मृत्यू, संशयित पतीला पोलिसांच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यातील शिरपूर ता...
Continue reading
प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत: मानसिक ताण, चिंता आणि नैराश्याबाबत खुलासा
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव स...
Continue reading
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
AI Impact Summit 2026 : रिलायन्स जिओ देणार “स्वस्त AI” – भारताला २१व्या शतकातील AI महाशक्ती बनवण्याचे स्वप्न, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
AI ...
Continue reading
MIM चा राज्यसभेत प्रवेश? ओवैसींचा भडकलेल्या आमदारांचा दावा
बिहारमध्ये राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापल...
Continue reading
तरुण व्यावसायिकांमध्ये वाढत आहे डीप व्हेन थ्रॉम्बोसिसचा धोका
आधी वृद्धांपुरता मर्यादित समजल्या जाणाऱ्या डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT)
Continue reading
मेंदूच्या जखमे नंतर हालचाली पुन्हा शिकण्याची प्रक्रिया : डॉक्टरांनी बॉबथ पद्धतीची माहिती दिली
मेंदूची जखम किंवा न्युरोलॉजिकल इज...
Continue reading
घरच्या घरी चाट बनवताना टाळा हे ६ सामान्य चुका, जे चवीत बिघडवू शकतात
चाट ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड्सपैकी एक आहे. प्रत्येक राज्यात चाटची विविध...
Continue reading
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव,
लातूर दौरा करुन ते आज हिंगोलीत पोहोचली आहेत.
हिंगोलीत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं, चक्क जेसीबीने
फुलांची उधळण करत राज ठाकरेंचा हिंगोली मनसैनिकांनी सन्मान केला.
यावेळी, येथील मनसे पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी
हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे.
हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुठे यांची राज ठाकरे यांच्याकडून
उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या आढावा बैठकीनंतर
स्वतः राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यामुळे, मनसेनं 4 जणांचं तिकीटवाटप केल्याचं पाहायला मिळत आहे.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात तानाजी सखारामजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत.
आता, या मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी जाहीर करत हिंगोली मनसेच्या जिल्हाध्यक्षांना
तिकीट दिलं आहे. राज ठाकरेंनी चक्क खांद्यावर हात ठेऊन, आता तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या,
असे आवाहन हिंगोलीकरांना व मनसैनिकांना केलंय.
त्यामुळे, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात आत्तापर्यंत मनसेचे 4 उमेदवार
जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये, दोन उमेदवार भाजपाविरुद्धच असल्याचं दिसून येतं.
पंढरपूर आणि आता हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत.
त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या
मनसेनं विधानसभेला महायुतीतून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/there-is-no-money-to-exchange-money-for-girls-sister/