महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राजगडवर बैठक झाली.
या बैठकीत मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी
स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच कोण कोणते
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
नेते निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत, त्याची विचारणा त्यांनी केली.
पक्षातील सर्वच नेत्यांना निवडणूक मैदानात उतरण्याचा सल्ला त्यांनी
यावेळी दिला. ठाकरे घराण्यातील अनेक जण आता सक्रीय राजकारणात
आहेत. परंतु थेट निवडणूक आतापर्यंत केवळ आदित्य ठाकरे उतरले.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत वरळी मतदार संघामधून ते निवडून
आले. त्यानंतरत अडीच वर्षे ते मंत्री राहिले. त्यांच्यानंतर विधानसभा निवडणूक
लढवण्याची इच्छा आता अमित ठाकरे यांनी व्यक्त केली. अमित ठाकरे
कोणता मतदार संघ निवडणार? हे अद्याप त्यांनी सांगितले नाही.
त्यांनी कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांनी आतापर्यंत पक्षाचे तीन उमेदवार जाहीर केले आहेत.
त्यात बाळा नांदगावकर (शिवडी), दिलीप धोत्रे (पंढरपूर), राजू उंबरकर
(लातूर ग्रामीण-विदर्भ) यांचा समावेश आहे. एकूण २०० ते २२५ जागांवर
निवडणूक लढवण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता
मनसेचे आणखी कोण कोणते नेते निवडणुकीच्या मैदानात उतरणार? हे
काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. रविवारी पुन्हा मनसेची बैठक होणार आहे.
त्या बैठकीत कोण कोणते नेते निवडणुकीच्या मैदानात उतरणार, त्याचा
अहवाल मांडणार आहे. दरम्यान, अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात
उतरल्यावर शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र
फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काय भूमिका घेणार? त्याकडे
लक्ष लागले आहे. तसेच २०१९ मध्ये आदित्य ठाकरे विरोधात मनसेने उमेदवार
दिला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, त्याकडे लक्ष असणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/michael-jacksons-emotional-and-heart-wrenching-death/