आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

अकोल्यात

अकोल्यात राष्ट्रवादी अजित पवार गट व मनसे कार्यकर्ते आमने सामने

मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरिंची गाडी

राज ठाकरे यांच्या बद्दल मिटकरिंनी केले होते वादग्रस्त विधान

Related News

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत.

येथील पूरग्रस्त नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली.

यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी

यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर

अप्रत्यक्ष टीका करत त्यांचा ‘सुपारीबाज’ असा उल्लेख केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेल्या

व्यक्तीने अजित पवारांवर भाष्य करू नये, असेही मिटकरी म्हणाले होते.

यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून,

त्यांनी अकोला येथे अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली आहे.

याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला असून,

त्यामध्ये गाडीच्या काचेही तोडफोड झाल्याचे दिसत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/shri-hanuman-sagar-still-tahanlelaach/

Related News