मिशन 500 पाच पाटील टीमकडून पुनोतीत वृक्षारोपण; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वृक्षारोपण

अकोला : पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा, झाडे जगवा या घोषणेसह अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती

गावात मिशन 500 पाच पाटील टीम व रोटरी क्लब नरिमन पॉईंट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम   

संपन्न झाला.या उपक्रमाचे संकल्पक ऍड. डॉ. उज्वलकुमार चव्हाण (माजी अप्पर आयुक्त, आयकर विभाग, मुंबई) तसेच

रोटरी क्लब नरिमन पॉईंट मुंबईचे आदित्य नेमानी होते. या वेळी श्रीकांत पायगव्हाणे (अभियंता, मुंबई

महानगरपालिका)शेखर निंबाळकर (पाच पाटील टीम सदस्य) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना विविध फळझाडे

आणि वृक्ष भेट देण्यात आले.शेतकऱ्यांनी दिलेली झाडे जगविण्याचे आश्वासन देत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात पाच पाटील प्रमोद सरदार, गाव प्रमुख विकास जाधव, स्वप्निल गावंडे, निलेश काकड, तुषार हांडे, अक्षय

काकड, राजेश काकड, अरविंद काकड, सरपंच गोळे साहेब, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पोलीस पाटील तसेच गावातील

मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.शेवटी, शेतकऱ्यांनी मिशन 500 पाच पाटील टीम व रोटरी क्लब नरिमन पॉईंट मुंबईचे

आभार मानत, पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

Read also : https://ajinkyabharat.com/shetkyancha-aakrosh-murtijapur-yehet-kala-poa-movement/