अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवनवीन घोळ बाहेर येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागात 31 जागा भरण्यासाठी ई निविदा
प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचे उघडकीस झाल्यानंतर याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह
दोन मोठे अधिकारी निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली होती. आता विविध कामांसाठी
कर्मचाऱ्यांपासूनच पैसे घेण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात कार्यरत एका
अधिपरिचरिकेने गंभीर आरोप करीत तक्रार दिली आहे. विनाकारण छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.
पैशाची मागणीही करण्यात आली आल्याचा आरोप आहे. डेपोटिशन ची ऑर्डर रद्द करण्यासाठी 20 हजाराची मागणी
करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. 15 हजार रुपये देऊन ऑर्डर रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान याचे फोन संभाषणाचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून या ऑडिओ क्लिप ची अजिंक्य
भारत न्युज पुष्टी करत नसली तरी कर्मचाऱ्यांकडून अधिकारी कशाप्रकारे पैसे उकळतात याबाबत तक्रारी करण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolachaya-railway-sthankawar-don-tarunant-tufan-free-style-hanamari/