मंत्रालयात आदिवासी समाजाचे आमदार आक्रमक

राज्याच्या

राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी आली आहे.

सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष

नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी

Related News

मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या

मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर

झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या.

मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे

प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी

म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी

आमदारांची आहे. तसेच पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची

मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय

हादरले आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी

नरहरी झिरवळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या

प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती.

मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे,

असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. त्या प्लॅन बी नुसार नरहरी

झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली.

त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब

वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात

पोहचली आहे. दरम्यान पोलिसांनी या सर्व आमदारांना बाहेर काढले.

त्यानंतर त्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले. आदिवासी

समाजातील आमदार आणि खासदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला आहे.

त्यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा

समावेश आहे. आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी

मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असे

करिण लहामटे यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष

केले. त्यामुळे आम्ही आंदोलन केले. आम्ही सुद्धा माणसे आहोत, असे

नरहरी झिरवळ यांनी म्हटले. दरम्यान, सत्ताधारी आमदारांनी केलेल्या

या आंदोलनानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेचे विरोध

पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/gunaratna-sadavarte-will-contest-against-aditya-thackeray/

Related News