रॉयटर्सने याआधी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफनंतर भारताने
अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदीच्या योजना थांबवल्या असल्याचे सांगितले होते.
मात्र, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, भारतासोबतच्या व्यापार चर्चेला ते टॅरिफचा मुद्दा निकाली निघेपर्यंत तयार नाहीत.
गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांच्या
प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “नाही, हे प्रकरण सुटेपर्यंत नाही.”
व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी सांगितले की, भारतावर
अतिरिक्त २५% शुल्क लादणे हा “राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा” आहे, जो नवी दिल्लीने “रशियाकडून तेल खरेदी
थांबविण्यास केलेल्या स्पष्ट नकार” याच्याशी संबंधित आहे.
