‘महाराणी येसूबाई’ प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये झाली शंभुराज खुटवडेसोबत पहिली भेट
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून महाराणी येसूबाईची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात
स्थान मिळवलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वात प्रवेश करत आहे.
नुकताच तिचा शंभुराज खुटवडे यांच्यासोबत साखरपुडा पार पडला असून लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
प्राजक्ताने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या हटके आणि फिल्मी लव्हस्टोरीचा किस्सा सांगितला.
ती म्हणाली,“माझ्या 18 व्या वर्षानंतर मला वेगवेगळ्या स्थळांची मागणी यायला लागली होती.
पण मला डिग्री पूर्ण करायची होती, म्हणून लग्नाचा निर्णय पुढे ढकलला.”
शंभुराजसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल प्राजक्ता म्हणाली,
“मी एका सिनेमाचं शुटिंग करत होते. नाईट शिफ्ट होती आणि अचानक माझ्या गाडीसमोर एक ट्रक येऊन धडकला.
मी घाबरून ट्रकच्या मालकाला बोलावायला सांगितलं. ड्रायव्हर विचित्र बोलू लागला, तेव्हा तो (शंभुराज) आला आणि सगळं सांभाळून घेतलं. ती खूप फिल्मी एन्ट्री होती.”
तिने हसत सांगितले,
“मी त्याला दादा म्हणायचे, पण त्याने मला कधी ताई म्हटलं नाही, नेहमी ‘मॅडम’च म्हणायचा.”
प्राजक्ता आणि शंभुराजच्या या फिल्मी सुरुवातीने आता आयुष्याचा नवा टप्पा सुरू होणार असून चाहत्यांकडून दोघांनाही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Read also : ajinkyabharat.com/borgav-manju-polis-thakya-rakshabandhan-sajri