नवरात्र उत्सवाला होणारी गर्दी पाहून प्रवाशांच्या सोयीसाठी
महामुंबई मेट्रोने पश्चिम उपनगरात जादा फेऱ्या चालविण्याचा
निर्णय घेतला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
(एमएमएमओसीएल) नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो ट्रेनच्या वाढीव
फेऱ्यांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि
एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मेट्रो
प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सणाच्यासुदीच्या काळात
वाढणारी गर्दी पाहून मेट्रोच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार
असल्याने प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या
सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत
अतिरिक्त मेट्रो सेवा पुरविण्यात येईल. या कालावधीत दररोज १२
अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येतील आणि दोन मेट्रो फेऱ्या
१५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे या उत्सवात सहभागी होऊन
मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा लाभ घेता येईल.
नवरात्रोत्सव लोकांना एकत्र आणतो आणि सर्व भाविकांना तसेच
नागरिकांना कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतूक प्रदान करणे आमची
जबाबदारी आहे. मेट्रो ट्रेनच्या सेवा वाढवून आम्ही प्रवाशांना
उत्सवादरम्यान रात्री उशीरा होणाऱ्या प्रवासासाठी सोयीस्कर
आणि आरामदायक वाहतूक पर्याय प्रदान करीत आहोत असे
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/navara-majha-navasacha-2-to-be-released-in-us-and-canada/