जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी
पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील
बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
Related News
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून
येत्या १८ जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
‘भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हाय अलर्ट’ दिला आहे.
जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून
रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक
ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तर विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्यात
मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह
मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तर याचवेळी वाऱ्याचा वेगळी ताशी ४० ते ५० किलोमीटर राहील,
असा अंदाज आहे. केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या काही भागांमध्ये
पुढील काही दिवसांत २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल.
दरम्यान, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर
रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prepare-instant-food-for-fasting-on-the-occasion-of-ashadhi-ekadashi/