मानसिक छळाला कंटाळून बीएएमएस विद्यार्थिनीची आत्महत्या; वडिलांनी पोलिसात तक्रार केली

मानसिक छळाला कंटाळून बीएएमएस विद्यार्थिनीची आत्महत्या

अकोला- अकोला शहरातील बीएएमएस अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कीर्ती मनोहर नगराळे (२९)

यांनी साखरपुडा झाल्यानंतर भावी पती व सासरकडील मंडळींकडून होणाऱ्या

मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेनंतर तिच्या वडिलांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कीर्ती शहरातील गीता नगर, लोटस ग्रीन अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती

आणि देशमुख हॉस्पिटलमध्ये पार्टटाइम नोकरी करत होती.

तिचा साखरपुडा २० जुलै २०२५ रोजी डॉ. आशिष गौतम वावळे यांच्यासोबत झाला.

नंतर काही दिवसांनी वरपित्याने विवाह जालना येथे करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी,

आणि नंतर २० ऑगस्ट रोजी अतिरिक्त २ लाख रुपयांची मागणी केली.

या मागण्यांमुळे कीर्ती तणावाखाली होती.

रातीच्या वेळेस, कीर्ती आणि आशिष यांच्यात वाद झाल्यानंतर,

कीर्तीने फ्लॅटमध्ये गळफास घेतला. घटनेच्या ठिकाणी पोलीसांनी पंचनामा केला

व तिचा मोबाइल व सुसाईड नोट जप्त केला. सुसाईड नोटमध्ये कीर्तीने स्पष्ट केले की,

तिच्या मृत्यूसाठी डॉ. आशिष व त्यांचे कुटुंबीय जबाबदार आहेत.

जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली

सखोल चौकशी सुरू असून आरोपींच्या विरोधात आवश्यक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेतून मानसिक छळ आणि दबावाचे गंभीर परिणाम स्पष्ट होतात.

तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व कौन्सिलिंग सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patil-yanni-numer/ 

Cha