मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंगफेक प्रकरण

मीनाताई

मुंबई  : मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकला. मीनाताई ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोत्री आहेत. त्यामुळे शिवसैनिक त्यांना आदराने ‘माँ साहेब’ म्हणतात. या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी म्हणाले,

“अशाप्रकारची घटना निषेधार्ह आहे. ज्या व्यक्तींनी हे कृत्य केले आहे, त्यांना पोलीस शोधून काढतील आणि योग्य कारवाई करतील. यापेक्षा जास्त राजकीय रंग देणे योग्य नाही.”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली:

“आजचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ज्याला स्वत:च्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, त्याने हे कृत्य केले असावे. महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. पोलीस या सगळ्या घटनेचा शोध घेत आहेत.”

घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. फॉरेंसिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून, फेकलेल्या रंगाचे ५ सॅंपल गोळा करण्याचे काम सुरू आहे. पोलीस आरोपींचा शोध घेण्यास सक्रिय झाले आहेत.या घटनेमुळे मुंबईत राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले असून, घटनास्थळी नागरिकांनीही सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/pakistancha-sangh-punha-drain-with-a-dramatic-maidanakade/