मूर्तिजापूर – नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या शोतोकान कराटे राज्यस्तरीय स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील एम. बी. कराटेच्या खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाने राज्यभरात
नावाजण्याजोगे यश संपादन केले आहे. चंचल कराटे स्पोर्ट नाशिक यांच्या आयोजनाखाली दि.16 ऑगस्ट 2025 रोजी स्ट्रॉबेरी स्कूल कडवे नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे ही स्पर्धा
उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एम. बी. कराटेच्या एकूण 23 खेळाडूंनी सहभाग नोंदवून 18 सुवर्णपदक व 5 रौप्यपदक पटकावून घवघवीत यश मिळवले.
काता व कुमिते या विभागांत खेळाडूंनी आपले कौशल्य सादर केले. अदविक शर्मा, स्थवन कुंभारे, साई भोरे, मंथन चींचे, लाभार्थ शेंडे, सक्षम कडू, अबिर बोर्ड, अंशुमन सरोदे, आर्यन
शेलोरकार, रुद्र फुके,सम्यक भोंगळे, अक्षरा ठाकरे, आराध्या कांडलकर, मनस्वी कावरे, आर्या मानकर, देवांश भांडे, सोहम तांडेराव व स्वरांजली वरवटकर यांनी सुवर्णपदक मिळवत
शहराचा मान उंचावला. तर विराज भारसाकडे, रियांश तांबडे, पुनम पोळेकर, शाहरुख शहा व शाम तालम यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
या यशामागे एम. बी. कराटेचे प्रेसिडेंट सेन्साई गंगाधर जाधव यांचे मार्गदर्शन, प्रशिक्षक समिर जाधव यांचे कष्ट व गजानन महाराज संस्थेचे उपाध्यक्ष संतोष भांडे यांचे प्रोत्साहन महत्वाचे
ठरले.खेळाडू मूर्तिजापूरात आगमन झाल्यानंतर त्यांचे प्रल्हाद शेलोरकार, प्रवीणराव मानकर, पुरुषोत्तम कडू, शिपाल कावरे व प्रशांत शेंडे यांनी मनःपूर्वक स्वागत करून पुढील
स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.या कामगिरीमुळे मूर्तिजापूर शहराचा क्रीडा क्षेत्रातील लौकिक अधिक वाढला असून, एम. बी. कराटेच्या खेळाडूंनी पुढेही राज्य व राष्ट्रीय पातळीवर यशाची
परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/the-high-hearted-shetkyanna-governance-level-madat-mivun-danyasathi-2/
