माया हिम्मतराव धोटे ‘जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन’च्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त

माया हिम्मतराव धोटे मानवाधिकार फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी

वाशिम प्रतिनिधी – सामाजिक कार्याची अखंड धडपड करणाऱ्या सौ. माया हिम्मतराव धोटे यांची

“जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन,

भारत सरकार” या संघटनेच्या वाशिम जिल्हा अध्यक्षपदी (दि.२४ ) निवड झाली आहे.

नाशिक येथील श्री राम तपोभूमी येथे नुकत्याच झालेल्या संस्थेच्या

चौथ्या अधिवेशनात या निवडीबरोबरच त्यांच्या समाजकार्यातील

उल्लेखनीय कार्याचा गौरव विशेष पुरस्काराने करण्यात आला.

या अधिवेशनाला संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर, माजी खासदार ब्रिगेडियर श्री. सुधीर सावंत,

नाशिकचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीष जाधव (DySP) तसेच

विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे विदर्भ सचिव प्रवीण कराळे यांच्या सूचनेनुसार

सौ. धोटे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नियुक्तीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना सौ. धोटे म्हणाल्या,

“वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत मानवाधिकारांची जाणीव पोहोचवणे,

महिलांचे सक्षमीकरण, मुलांचे शिक्षण,

युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझे प्रमुख ध्येय असेल.

अन्याय, शोषण आणि भेदभावाविरुद्ध लढा देणे हीच खरी सेवा आहे.”

तसेच यासाठी जनजागृती मोहीमा, कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरे

आयोजित करण्याचाही संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीमुळे वाशिम जिल्ह्यातील मानवाधिकार कार्याला नवा वेग मिळेल,

असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून

सर्व स्तरांतून सौ. माया धोटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

read also :https://ajinkyabharat.com/karkheda-grampanchayatich-navigable-undertaking/