मविआच्या जागावाटपाचा दसऱ्याचा मुहूर्त!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास

आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे.

त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास

Related News

आघाडीचे तब्बल 250 जागांवर एकमत झाले असून असून

दसऱ्याला जागा वाटप जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांकडून

मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा

फटका बसला तर महाविकास आघाडीला यश मिळाल्याचे दिसून

आले. यानंतर विधानसभा निवडणुकीतही महायुतीला फटका

देण्यासाठी महाविकास आघाडीत खलबत सुरु आहेत. त्यामुळे

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा धडाका सुरु असल्याचे

दिसून येत आहे. आता महाविकास आघाडी याच आठवड्यात

संपूर्ण जागावाटप पूर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे.

त्यानंतर दसऱ्याच्या जवळपास तिन्ही पक्ष मिळून एकत्रित

जागावाटप जाहीर करणार आहेत. मात्र अजूनही काही जागांवर

महाविकास आघाडीमध्ये तिढा आह. साधारणपणे 250 जागांवर

महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. या जागांचे जागावाटप

महाविकास आघाडीकडून दसऱ्याच्या दरम्यान जाहीर केले जाईल,

अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sambhajirajes-big-announcement-in-view-of-upcoming-assembly-elections/

Related News