संयुक्त पत्रकार परिषदेत केले स्पष्ट
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तब्बल ३० जागा
जिंकण्यात यश मिळाले. मात्र, महाविकास आघाडी
Related News
विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार की नाही?
याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते.
यानंतर आज महाविकास आघाडीच्यावतीने जनतेचे आभार मानण्यासाठी
आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी
मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक
ही एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना तुम्ही पुन्हा एनडीएबरोबर जाणार का?
असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताच शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण खळखळून हसले.
काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक विधान केले होते
ते म्हणाले होते, देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर
१५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील,
त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आले होते.
आता यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता
उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिले.
उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए बरोबर दिसतील
असं काही दिवसांपूर्वी
आमदार रवी राणा यांनी म्हटले होते.
हा प्रश्न महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ठीक आहे जाऊद्या.
त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे कधी ना कधी एनडीएबरोबर येतील असे बोलले जात आहे,
असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले,
बरं ठीक हे समजा मला जायचे,
मग यांच्यामध्ये (महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये) बसून तुम्हाला सांगू का?,
असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
त्यांच्या या उत्तरावर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण खळखळून हसले.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचार करताना इंडिया आघाडीला मतं दिले
तर तुमची संपत्ती मुस्लिमांना देतील असा प्रचार केला.
तसेच मंगळसूत्र याबाबतही नरेटिव्ह भाजपाने केलं होतं.
मी नकली संतान हेही नरेटीव्ह होतं, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली.
जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात,
तेव्हा माध्यमांसमोर येण्याआधी आमची प्राथमिक बैठक होते.
येणारी विधानसभेची निवडणूक जे जे लोक आमच्याबरोबर आहेत.
तसेच महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष
आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून
आम्ही निवडणूक लढणार आहोत,
असं आगामी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचं गणित
उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानताना शरद पवार म्हणाले,
त्यांनी ज्या ज्या मतदारसंघात सभा घेतल्या, रोड शो घेतले,
त्या त्या ठिकाणी मविआच्या उमेदवारांचा विजय झाला.
मोदींनी १८ सभा आणि एक रोड शो घेतला होता.
त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला.
म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात
पंतप्रधान मोदींच्या जेवढ्या अधिक सभा आणि दौरे होतील,
तेवढे आम्हाला स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल.
त्यामुळे मोदींना धन्यवाद दिले पाहीजेत.
भाजपाला चांगला धडा शिकवला !
महाविकास आघाडीला महाराष्ट्रत मोठे यश मिळाले.
या निवडणुकीत आमचे तीन पक्ष असले तरी छोटे-मोठे पक्ष आणि काही संघटना
आणि काही सामाजिक कार्यकर्ते आमच्याबरोबर होते.
त्यामुळे या सर्वांचे आभार आम्ही मानतो.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने मोठा पाठिंबा दिला.
भाजपाला शेतकऱ्यांनी चांगला धडा शिकवला.
काही ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, धार्मिक ध्रुवीकरणाचा निवडणुकीत काहीही परिणाम झाला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची प्राथमिक बैठक झाली.
लोकसभेप्रमाणे आम्ही विधानसभेची निवडणूकही लढणार आहोत,
असे पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्पष्ट केले.
Read also : https://ajinkyabharat.com/pakistan-out-of-t20-world-cup/