बोरगाव मंजू :- अकोला तालुक्यातील मासा सिसा ऊदेगाव येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना
जिल्हा उपाध्यक्ष सतीश मधुकरराव फाले आणि अकोला ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तपेढ्यांकडून सामाजिक व राजकीय संस्थांना
रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले यांनी तातडीने शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली.
या शिबिरात श्री शिव प्रतिष्ठान व लहुगर्जना मित्रमंडळासह शेकडो तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.
उपस्थित मान्यवरांनी समाजातील प्रत्येकाने रक्तदान करून मानवतेचे ऋण फेडावे, असे आवाहन केले.
या उपक्रमाच्या यशासाठी मनसे तालुकाध्यक्ष सौरभ फाले, ओम बोळे, मोहन फाले, गोपाल इंगळे, ऋषिकेश बोळे, शेखर स्वर्गीव, प्रदीप आखरे,
संचित फाले, निलेश आगरकर, धनराज सहारे, रोशन राऊत, अजय राऊत, नारायण मेहरे, माधव येळे, आदित्य घाटोळे, अजय सरकटे, चेतन
शेंद्रे, रोशन स्वर्गीव, प्रतिक बोळे, नंदकिशोर येळे आदींसह अनेक मनसैनिकांनी परिश्रम घेतले.