कर्तव्यावर असताना अयोध्येत आले वीरमरण
काटेपूर्णा गावात पसरली शोककळा
अकोला तालुक्यातील काटेपूर्णा गावचे सुपुत्र आणि फाईव्ह मराठा बटालियनचे शूर जवान नितेश मधुकर घाटे यांना
अयोध्येतील सेवेदरम्यान २८ जुलैला वीरमरण आले. त्यांच्यावर काटेपूर्णा शासकीय येथे इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
१५ वर्षांपासून भारतीय सैन्यात सेवा देणाऱ्या नितेश घाटे यांचे पार्थिव शरीर त्यांच्या मूळगाव काटेपूर्णा येथे पोहोचले.
त्यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या साश्रुनयनांनी गावात एकच आक्रोश झाला. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता.
नितेश घाटे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, वृद्ध आई-वडील आणि एक लहान मुलगी आहे. वडिलांचे छत्र हरवल्याने त्या चिमुरडीच्या
आयुष्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. कर्तव्यनिष्ठेने जीवन जगलेल्या या शूर
जवानाचा अकाली अंत सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक ठरला आहे.
Read Also :.https://ajinkyabharat.com/lal-tondya-mothya-makadachi-panic/