पातुर तालुक्यातील पहिले शहीद, सन १९७१ च्या भारत–पाकिस्तान युद्धात सीमेवर वीरमरण आलेले पातुर येथील शहीद आनंदराव काळपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार पेठ, पातुर येथे भव्य देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाने पातुरकरांच्या मनात देशभक्तीची ज्योत अधिक प्रज्वलित केली.
‘एक शाम देश के नाम’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात सुरुवातीपासून शेवटपर्यंत देशभक्तीचा ज्वलंत उत्साह अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी “शहीद आनंदराव काळपांडे अमर राहो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात पातूर येथील गायक-कलावंत कराओके ग्रुपच्या वतीने देवानंद गहिले, शेख मुक्तारभाई, विनोद भाऊ इंगळे, प्रा. करुणाताई गवई, प्रा. विठोबा गवई, शेख मेहबूब भाई, सलीम भाई, अविनाश काळपांडे, प्रभुदास बोंबटकर, प्रल्हाद गवई, शेख वसीम भाई आदी मान्यवर गायक-कलावंतांनी एकापेक्षा एक सकस देशभक्तीपर गीते सादर केली. त्यांच्या उत्कृष्ट गायकीमुळे संपूर्ण कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा ठरला.
Related News
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
‘अंधभक्त’ म्हणणाऱ्यांना ईशा कोपिकरने सुनावलं; प्रेमात आंधळे होऊ शकता तर देशाच्या प्रेमात का नाही?
अभिनेत्री ईशा कोपिकर सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नीट पेपरफ...
Continue reading
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यार्थी आंदोलनांवर बॉलिवूडमधील आघाडीच्या...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
3 किलो सोन्याची नाणी 50 लाखांत देण्याचे आमिष, कोल्हापूरच्या हॉटेल व्यावसायिकाची अकोल्यात 15 लाखांची धक्कादायक फसवणूक
अकोला : स्वस्तात मोठ्या प्रमाणावर सोनं मिळणार असल्याचे आमिष दा...
Continue reading
आसाममध्ये भारतीय लष्कराच्या AN-32 विमानाचा भीषण अपघात; 5 जवानांना वीरमरण, को-पायलट गंभीर जखमी
जोरहाटमध्ये लष्करी विमानाचा भीषण अपघात; 5 जवानांचा मृत्यू, हवाई दलाची मोठी कारवाई
दे...
Continue reading
राळेगणसिद्धीला भारतीय लष्कराकडून T-55 रणगाड्याची ऐतिहासिक भेट
T-55 रणगाड्याची ऐतिहासिक भेट : अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी हे नाव देशभरात ग्रामविकासाच्या आदर्श मॉडेलमुळे प्रसिद...
Continue reading
देश सध्या कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक खर्च आणि परदेश दौरे टाळण्याचे महत्त्वपूर्ण...
Continue reading
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भव्य विजयाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्रीय कॅबिनेटच...
Continue reading
Dhurandhar 2 Review : रणवीर सिंहचा स्फोटक अवतार, अॅक्शन आणि भावनांचा जबरदस्त संगम
Dhurandhar 2 Review : बॉलिवूडमध्ये एखाद्या चित्रपटाच्या रिलीजला सणासारखी उत्सुकता निर्माण होणे ...
Continue reading
‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’मधील ‘चांद देख लेना’चा टीझर रिलीज; प्रेम, विरह आणि सैनिकांच्या आयुष्याची भावनिक कहाणी
बॉलिवूडमध्ये सध्या देशभक्ती आणि मानवी भावनांचा संगम अस...
Continue reading
आलेगाव प्रतिनिधी – आलेगावमधील प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट शाळेत होळीचा सण यंदा पारंपरिक संस्कृतीसह पर्यावरणजागृती या दोन्ही उद्दिष्टांसाठी उत्साहात साजरा करण्यात आला. “माझी शाळा, सुंदर...
Continue reading
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. करुणाताई गवई यांनी सादर केलेल्या अजरामर गीत “ए मेरे वतन के लोगो” या गीताने झाली. या गीताच्या मार्मिक सादरीकरणामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यानंतर विविध देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय केले. समारोप सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत सन्मानपूर्वक गाऊन केला, ज्याने कार्यक्रमाची औपचारिकता आणि भावना दोन्ही अधिक प्रभावी बनवली.
या सोहळ्यात पंचफुलाबाई काळपांडे आणि पर्वताबाई काळपांडे, शहीद आनंदराव काळपांडे यांच्या नातेवाईकांच्या हस्ते सर्वप्रथम पूजन केले गेले, ज्याने कार्यक्रमाला अधिक औपचारिक आणि भावनिक स्पर्श मिळाला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रभुदास बोंबटकर यांनी केले, तर प्रास्ताविक छत्रपती उर्फ गजानन गाडगे यांनी करून शहीद आनंदराव काळपांडे यांच्या शौर्याचा गौरवपूर्ण आढावा मांडला.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रदीप उर्फ छोटू काळपांडे, छत्रपती गाडगे, प्रभुदास बोंबटकर, सचिन वारोकार, अविनाश काळपांडे, प्रकाश भाऊ निमकंडे, विजय इंगळे, कृष्णा बोंबटकर, उमेश काळपांडे, महेश काळपांडे एडवोकेट काळपांडे यांच्यासह गुरुवार पेठमधील सर्व युवक-युवतींनी विशेष परिश्रम घेतले.
शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देणारा व नव्या पिढीत देशप्रेमाची जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम पातूरच्या सांस्कृतिक जीवनात एक अविस्मरणीय ठसा उमटवून गेला. उपस्थितांचे उत्साहपूर्ण प्रतिसाद, भावनिक सादरीकरण आणि देशभक्तीची प्रखर भावना या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम अत्यंत स्मरणीय ठरला.
read also : https://ajinkyabharat.com/senior-journalist-sudhir-pathaks-writings-are-inspiring-opinion-of-journalists-at-late-sudhir-pathak-memorial-day-program/