विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

रिसोड : विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

रिसोड तालुक्यातील कवठा येथे एका २२  वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११  ऑगस्ट रोजी रात्री घडली.

मृत महिलेचे नाव सुवर्णा विशाल पुंड (रा. कवठा) असे असून, याबाबत तिचे सासरे नामदेव गणपत पुंड यांनी रिसोड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, सुवर्णा पुंड या ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता शौचासाठी बाहेर गेल्या होत्या.

बराच वेळ उलटूनही त्या परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. गावातील काही मुलांनी त्या किनखेडा मार्गाने जाताना दिसल्याची माहिती दिली.

त्या मार्गाने शोध घेत असताना रमेश नामदेव अल्लाड यांच्या शेतातील विहिरीजवळ सुवर्णा यांच्या चप्पल आढळून आल्या.

यानंतर विहिरीत गळ टाकून पाहिले असता त्यांचा मृतदेह वर काढण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन केले.

१२ ऑगस्ट रोजी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे

Read also :https://ajinkyabharat.com/womens-officer-ias-more-mental-and-sexual-allegations/