कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आज पहाटे
तीन वाजता अंतरवाली सराटी येथे भेट झाली, सरपंचाच्या घरी
दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती मनोज जरांगे
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर दोघांमध्ये
चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
दरम्यान आज परळी येथे मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक होणार
असून, त्या अगोदर दोघांमधील भेट महत्त्वाची मानली जाते. काल
परळीमधील गणेश उत्सवाचा मध्यरात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर
धनंजय मुंडे थेट परळीतून अंतरवाली मध्ये दाखल झाल्याची
माहिती आहे. याबाबत धनंजय मुंडे यांचे अद्याप प्रतिक्रिया आलेली
नाही. जरांगे पाटील यांनी भेटीचा तपशील सांगितला. जरांगे
पाटील यांनी सांगितले की, मी झोपेत होतो. पहाटेच्या तीन वाजता
ते आले असतील. आमच्यामध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा
झाली. अंतरवलीत कोणीही येऊ शकतो. आमच्याकडे आयतं
मैदान आहे. आम्हाला तयारी करायची गरज नाही, त्यांनी उद्या जरी
निवडणूक घेतली तरी तयार असल्याचे ते म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले की, मी माझ्या मुद्यांवर ठाम असून माझ्या
जीवात जीव आहे तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ते
फक्त ओबीसीतून कायम ठाम असणार आहे. ज्यावेळी आमची
आरक्षण संदर्भात चर्चा झाली तेव्हा व्यासपीठावर धनंजय मुंडे सुद्धा
होते. घोंगडी बैठक परळीत होत असून आणि ती ताकदीने होणार
असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मी कोणाचाच होऊ
शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा, कोणत्या
महायुतीचा मी नाही. मी फक्त मराठ्यांचा असल्याचे जरांगे
म्हणाले. आंतरवाली सराटीत कोणीही येऊ शकतं तो आमचा
पाहुणा आहे. मला इथं मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते, असे
जरांगे म्हणाले. मी जातीवादी नसल्याचे जरांगे यांनी नमूद केले.
Read also: https://ajinkyabharat.com/surat-ranked-first-in-clean-air-quality/