सध्या मराठी रंगभूमीवर सादर होणारे नाटक ‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वावर आणि त्याच्या इतिहासावर थेट भाष्य करत आहे. या नाटकात मराठी माणसाला मिळणारी किंमत, त्याचे संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेचा अभिमान प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्थेद्वारे सादर केलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संदिप जंगम यांनी केले आहे.
नाटकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घडलेल्या विविध घटनांचा आढावा घेऊन त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेची कथा प्रेक्षकांसमोर आणली जाते. नाटक पाहताना प्रेक्षकांना पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो तसेच मुंबईसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांच्या कथा डोळे पाणावून टाकतात. याचसोबत आजच्या मुंबईतील मराठी माणसाच्या स्थानाची खरी वास्तविकता प्रेक्षकांसमोर येते.
गावागावातून मुंबईत आलेल्या मराठी माणसांच्या कष्टावर उभी राहिलेली ही नगरी आज बदलत चालली आहे. गिरगाव, लालबाग, परळ, दादर यांसारख्या मराठी वस्तींच्या भागात आज मराठी माणूस किती उरलाय, हा सवाल नाटकातून विचार करायला भाग पाडतो. “मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” असा ठाम आवाज देणाऱ्या मराठी जनतेच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीवर नाटक प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
Related News
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट ‘खंजिरीचे बोल’ या चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबईत उत्साहात संपन्न झाला. हा कार्य...
Continue reading
नागपुरात सोमवारी ‘शिव व्याख्यान’; राहुल गिरी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा उलगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेचा अनुभव घेण्याची संधी नागपुरवासी...
Continue reading
अकोट : शहरातील सांस्कृतिक कलाभवन येथे जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ पार पडला. वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या ग्रंथोत्सवात ...
Continue reading
आजचा दिवस मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसाठी विशेष आहे कारण आज गौरव मोरे यांचा वाढदिवस आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा प्रवास, चित्रपट आणि मालिक...
Continue reading
वाढवण बंदराजवळ विमानतळ कशासाठी? Raj ठाकरे यांचा तीव्र सवाल; मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप
उद्धव–Raj ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ...
Continue reading
संजय राऊत : निवडणुका जाहीर होताच चेहऱ्यावरचा मास्क उतरवला आणि मराठी माणसासाठी महत्त्वाचे विधान
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकीच्या तारख...
Continue reading
धर्म, शेतकरी, जमीन आणि इथला मराठी माणूस… ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांची हृदयस्पर्शी प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात छत्रपती
Continue reading
मुंबादेवी मंदिरात मराठी अभिनेत्याला असं काय दिसलं?
म्हणाले “इथे यूपी-बिहारचा फिल… मराठीपण कुठे हरवलं?”
मुंबई — “मुंबई सर्वांना सामावून घेते… पण तिच्या...
Continue reading
राजवाडे घराण्याचा भव्य विवाहसोहळा; ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये ११ दिवस जल्लोष!
गोव्यात रंगणार मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठं डेस्टिनेशन वेडिंग; संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेचा ...
Continue reading
मुंबईची प्रगती मराठी माणसाच्या थडग्यावर…; राज ठाकरेंचा खरमरीत टोला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अदानी पॉवर प्रकल्पावरून मनसे अध्यक्षांचा सरकारला इशारा
महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
विशेष म्हणजे, नाटकात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून सादर केलेले दृश्य नाटकाला नवा आयाम देतात, ज्यामुळे प्रेक्षकांना नाट्यचित्र माध्यमाचा अनोखा अनुभव मिळतो. या नाट्यकृतीला आदेश बांदेकर आणि उदय सबनीस यांचं निवेदन आहे.
नाटकाच्या संगीतासाठी रोहन पाटील, प्रकाशयोजनासाठी राजेश शिंदे, AI चित्रफितीसाठी प्रसाद सोनावणे आणि हर्ष राऊत, गायनासाठी मनोहर गोलांबरे आणि रविंद्र खोमणे, तसेच अभिनयासाठी गणेश जाधव आणि संदिप जंगम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या नाटकाची निर्मिती महेश भोसले आणि संदिप जंगम यांनी केली आहे.
नाटक मराठी माणसाच्या इतिहासावर, आजच्या स्थितीवर आणि मुंबईतील मराठी अस्मितेच्या टिकावावर प्रभावीपणे प्रकाश टाकते. प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी प्रेक्षक यावर विचार करायला भाग पडतो, तसेच त्याच्या अस्तित्वावर आणि हक्कावर सवाल उपस्थित होतो.
read also : https://ajinkyabharat.com/rajmata-jijau-bus-service-started-in-the-state-3000-smart-buses-will-soon-run-on-mumbai-pune-nagpur-route/