सेंट पॉल्स अकॅडमी अकोटमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

सेंट पॉल्स

अकोट – सेंट पॉल्स अकॅडमी अकोट येथे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष नवनीत लखोटिया होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष लुनकरण डागा, सचिव प्रमोद चांडक, दीपम लखोटिया, शारदा लखोटिया, सुधा डागा आणि रेखा चांडक उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल, व्यवस्थापक प्रभुदास नाथे, पर्यवेक्षक अभिजीत मेंढे, सारिका रेळे, मालती महल्ले आणि वैशाली गावत्रे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्व मराठी विषय शिक्षिकाही उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमापूजनाने आणि दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर वर्ग सातवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले, ज्याला डॉ. अर्चना रायबोले आणि योगेश चेडे यांनी साथ दिली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच सर्व मराठी विषय शिक्षकांचा गौरवही पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. शिक्षिका सुमती वानखडे यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर विद्यार्थिनींनी मराठी भाषेचे गौरवगीत सादर केले. शिक्षक पल्लवी ढगे यांनी कविता सादर केली आणि नंतर वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त इयत्ता पहिली, दुसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली. वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरणावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न असलेली लेखी स्पर्धा घेण्यात आली, तर वर्ग तिसरी, चौथी व सातवीसाठी एक मिनिट वक्तृत्व स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.

Related News

मुख्याध्यापक विजय बिहाडे यांनी भाषणात मराठी भाषेची महत्ता सांगितली व विद्यार्थ्यांना मराठी पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा कुलकर्णी व रोहिणी कोकाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वनिता थोरात व दिपाली कुलट यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता सोनो, अर्चना वनवे, अभिलाष निचळ, अभिलाष काळमेघ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सर्व उपस्थितांनी मराठी भाषेप्रती आपले प्रेम व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना भाषेचा गौरव अनुभवता आला.

read also :  https://ajinkyabharat.com/murtijapurchya-junya-holi-rangpanchamichya-memories/

Related News