मराठी चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

ज्येष्ठ अभिनेते

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते विजय कदम यांचे

निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Related News

त्यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.

गेल्या काही वर्षापासून ते कर्करोगाशी त्रस्त होते.

आज सकाळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या निधनाची माध्यमांना माहिती दिली.

अंधेरी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली दिली आहे.

ऐंशी ते नव्वदच्या दशकात विजय यांनी मराठी चित्रपटात काम केल.

चित्रपटासोबत मालिका आणि नाटकात देखील काम केल.

दे दणादण, धडक बेधडक, हळद रुसली, कुंकू हसलं अश्या अनेक

मराठी चित्रपटांत कामे करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

टूरटूर, विच्छा माझी पूरी करा अश्या नाटकांत देखील काम केल.

विजय यांनी अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भुमिका निभावल्या आहेत.

मुंबईतील अंधेरी येथे ते वास्तवास होते. वयाच्या  ६७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्याच्या पाश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अंधेरी येथील ओशिवरा

येथील स्माशनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/aman-sahrawatne-wins-bronze-medal-in-paris-olympics/

Related News