मुंबई | ९ मे :
राज्याच्या समृद्ध इतिहासाची सैर आता ट्रेनने करता येणार आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांना,
सांस्कृतिक स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी ‘मराठा पर्यटन ट्रेन’ येत्या ९ जूनपासून प्रवास सुरू करणार आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
आयआरसीटीसीच्या ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत ही यात्रा ६ दिवसांची
असेल आणि यात मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा अनुभव मिळणार आहे.
यात्रेचा प्रारंभ व मार्ग:
-
ट्रेन ९ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच दादर आणि ठाणे येथून रवाना होईल.
-
या प्रवासात पर्यटकांना ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ९ प्रमुख स्थळांचे दर्शन घेता येणार आहे.
पर्यटन स्थळांचा समावेश:
-
किल्ले रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानी ठिकाण
-
लाल महाल, पुणे – बालशिवाजींचे वास्तव्य
-
कसबा गणपती मंदिर, पुणे
-
शिवसृष्टी प्रकल्प – पुण्यातील ऐतिहासिक प्रकल्प
-
किल्ले शिवनेरी – शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ
-
भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर
-
किल्ले प्रतापगड – अफझलखान वधस्थळ
-
अंबाबाई मंदिर, कोल्हापूर – करवीर निवासिनीचे दर्शन
-
किल्ले पन्हाळगड – शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे ठिकाण
विशेष यात्रा पॅकेज:
प्रत्येक प्रवाशाला विशेष पॅकेज अंतर्गत प्रवास, भोजन, निवास आणि मार्गदर्शक सेवा दिली जाणार आहे.
ट्रेनमध्ये आरामदायक सुविधांसह मराठा इतिहासावरील माहितीपर सादरीकरणही करण्यात येणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/virat-kohlichi-test-cricketmadhun-retirement/