मराठा आरक्षण आंदोलन : डीजे-हुल्लडबाजी टाळा; शिस्त पाळा, मनोज दादांची इज्जत राखा – समन्वयकांचे आवाहन

https://ajinkyabharat.com/educate-girls-institute-ramon-magsaysay-award-2025/

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील

आझाद मैदानावर उपोषणाला बसले असून दक्षिण मुंबईत मोठी गर्दी उसळली आहे.

काही ठिकाणी हुल्लडबाजीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक

गंगाधर काळकुटे पाटील यांनी “डीजेवर नाचू नका, दारू पिऊन येऊ नका,

शिस्त पाळा; मनोज दादांची इज्जत घालवू नका,” असे आवाहन केले.

परवाना वेळा: आंदोलनासाठी सकाळी ९ ते रात्री ६ या

वेळेतच परवानगी देण्यात आली आहे.

गंगाधर काळकुटे पाटील म्हणाले, “मराठा क्रांती मोर्च्याप्रमाणे शांतता व शिस्त

ठेवली नाही तर चळवळीची बदनामी होते.

मनोज दादांचं हे आठवं उपोषण; तब्येतीचा धोका पत्करून ते लढत आहेत.

कुणी कायदा हातात घेतल्यास त्याला तिथेच रोखून पोलिसांच्या ताब्यात द्या.”

पत्रकारांबाबत घडलेल्या एका प्रकाराबद्दल समन्वयकांनी जाहीर

माफी मागत मुंबईकरांना त्रास होणार नाही, रस्ते/रेल्वे अडवू नयेत, कचरा न टाकावा,

पोलिसांना सहकार्य करावे, अशी विनंती केली.

“छत्रपतींचा गौरवशाली वारसा आहे; त्याला गालबोट लागू देऊ नका,”

असेही त्यांनी ठणकावले.

Read also : https://ajinkyabharat.com/educate-girls-institute-ramon-magsaysay-award-2025/