मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील
यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आझाद मैदानातील उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंदोलकांची गैरसोय होऊ नये,
यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) युद्धपातळीवर सुविधा पुरवण्यात येत आहेत.
पावसातही सुविधा अखंड
आझाद मैदानातील चिखल हटवून प्रवेशमार्गावर दोन
ट्रक खडी टाकण्यात आली आहे.
मैदान परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था राहावी,
यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे दिवे उभारले आहेत.
पाणी व स्वच्छतेची सोय
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे ११ टँकर्स मैदानावर उपलब्ध
करून देण्यात आले आहेत, तर अतिरिक्त टँकर्सचीही मागणी केली आहे.
आंदोलनस्थळ आणि परिसरात सातत्याने स्वच्छता राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमले आहेत.
आरोग्य सेवा सज्ज
आंदोलकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी
म्हणून मैदानात आरोग्य कक्ष उभारण्यात आला आहे.
चार वैद्यकीय पथके, दोन रुग्णवाहिका आणि १०८ आपत्कालीन सेवा सतत कार्यरत आहेत.
मोफत शौचालये उपलब्ध
आझाद मैदान व परिसरात एकूण २९ शौचकूप असलेले शौचालय,
फिरती शौचालये, तसेच आसपासच्या परिसरातील
२५० शौचकूपे आंदोलकांसाठी मोफत खुली ठेवण्यात आली आहेत.
धूम्रफवारणी व अन्य उपाययोजना
पावसाळी परिस्थितीत कीटकनाशक धूम्रफवारणीसाठी
दोन स्वतंत्र पथके कार्यरत असून परिसराची स्वच्छता
आणि आरोग्य सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
उपाहारगृहे सुरूच
आझाद मैदान परिसरातील उपाहारगृहे व खाद्यपदार्थांची दुकाने
सुरू असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कुठेही बंद केलेला नाही,
असे BMC ने स्पष्ट केले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/american-corte-trump-toriff-bakedishir-declared/