रिसोड (अकोला) – राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या नव्या आद्यादेशामुळे ओबीसी समाजामध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. आज (ता. 9 सप्टेंबर) रिसोड तालुका ओबीसी समाज आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने भाजी मंडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिव्हील लाईन, पोस्ट ऑफिस चौक ते तहसिल कार्यालयावर हजारोच्या संख्येने मोर्चा काढला आणि तहसीलदार मार्फत राज्यशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चा भाजी मंडीपासून सुरू झाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये समाप्त झाला. या आंदोलनात ओबीसी समाजाचे बंधू-भगिनी पिवळ्या टोपी घालून सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरक्षणाचा बचाव करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
समिती अध्यक्ष दिपकराव बुधवंत, नारायणराव सानप, समता परिषदेचे भागवत गाभणे, प्रा. ज्ञानेश्वर मुंडे आदींनी आंदोलनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी राज्यशासनाला या आद्यादेशामुळे ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून दिली.
मोर्च्यात विविध घोषणांनी आसमंत गूंजवले:
“आरक्षण नाही कोणाच्या बापाचे आहे, आमच्या हक्काचे आहे!”
“ओबीसी एकजुटीत अग्रसर व्हा!”
“न्याय न मिळवता आम्ही थांबणार नाही!”
विशेष लक्षवेधी बाब म्हणजे या मोर्चात आजी-माजी लोकप्रतिनिधी व भावी उमेदवारांचा गहिवर गैरहजर राहणे. यामुळे सामाजिक व राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांनी या गैरहजेरीला निवडणुकीशी जोडले आहे.
ही कारवाई राज्यभरातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षात महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. हजारो ओबीसी बांधवांनी राज्यशासनावर दबाव आणण्यासाठी हा अल्गार काढला असून, आवश्यक तो निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी ठामपणे सांगितले आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/rohit-sharma-rugnalayat-prayer-chaityamadhyaye-khabal/