अकोला :
मराठा पाटील समाजातील अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नांवर मोकळा संवाद घडवून आणण्यासाठी, परंपरेच्या नावाखाली रुजलेल्या अनिष्ट रूढींना छेद देण्यासाठी आणि भावी पिढीसाठी विवेकी समाजघडणीचा ध्यास घेऊन मराठा पाटील संघ, बाळापुर तालुक्याच्या वतीने आज (दि. १७) ‘समाजसंवाद पदयात्रे’चा शुभारंभ होत आहे. दुपारी ३ वाजता काजीखेड येथून मान्यवरांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
संस्थापक अध्यक्ष प्रा. राजदत्त मानकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली व संघटनेचे अध्यक्ष शरद वानखडे यांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही पदयात्रा २६ जानेवारीपर्यंत काजीखेड ते वाडेगाव या मार्गावरून प्रवास करणार आहे. “सहभागी व्हा! सहभागी व्हा!” अशी समाजाला साद घालणारी ही पदयात्रा केवळ चालण्याची नव्हे, तर विचारांची व परिवर्तनाची ठरणार आहे.
पदयात्रेदरम्यान समाजातील लग्नसमारंभातील वाढता खर्च, वर–वधू संशोधनातील विलंब, कृषी शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर प्रत्येक गावात सभा घेऊन मुक्त विचारमंथन होणार आहे. समाजाने स्वतःशी संवाद साधत प्रश्न ओळखावेत व उत्तरांची सामूहिक वाटचाल करावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Related News
ग्राहक संरक्षण संघाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी
अकोला महापालिका निवडणूक: काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी मतदान करून केला प्रचार
मतदार गौतम गरड यांचा हृदयविकाराने मृत्यू, कुटुंबावर आर्थिक संकट
अकोला शहरात पतंग उडवताना युवक गंभीर जखमी
Jijau Swami Vivekanand Jayanti ZP School | जि.प. शाळेत जिजाऊ–स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
वन्यप्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा , लक्ष्मीकांत कौठकर शेतकरी संघटना विदर्भ अध्यक्ष,यांचा आंदोलनाचा इशारा
5 महत्त्वाच्या चुका जे तुम्ही घरी CCTV कॅमेऱ्यासोबत करू नयेत – सुरक्षिततेसाठी आवश्यक टिप्स
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा बहुमूल्य उपक्रम; विधवा महिलेला रक्तपुरवठा करून दिला जीवनदायी आधार
Akola News : अकोला हादरले! काँग्रेसच्या बड्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता
पशुवैद्यकीय विभाग झाला जागा; त्वचा रोगग्रस्त कुत्र्यांचा प्रश्न मात्र कायम
या प्रवासात काजीखेड, जानोरी मोखा, वझेगाव, हिंगणा दगडखेड, नागद, सागद, बहादुरा, कारंजा, सोनाळा, बोरगाव वैराळे, शिंगोली, मोरझाडी, उरळ बु., मोरगाव, हसनापूर, अडोशी, सोनगिरी, वाडेगाव, मानकी, सांगवी, बाळापूर आदी गावांत मुक्काम व ग्रामसभा होणार आहेत. दररोज सकाळी ८.३० वाजता पदयात्रेला सुरुवात होऊन सायंकाळी ५ वाजता मुक्कामाच्या गावी पोहोचणार आहे.
हार, शाल, पुष्पगुच्छांसारख्या दिखाऊ सत्कारांना फाटा देऊन विचार, सहभाग व संवादाला प्राधान्य देण्याचे आवाहन अध्यक्ष शरद वानखडे यांनी केले आहे. वारकरी दिंडी ग्रामप्रदक्षिणेसाठी रथासमोर ठेवणे, गुणवंत विद्यार्थ्यांची यादी सादर करणे, महिला, युवक, युवती व बालकांचा सक्रिय सहभाग घडवून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पदयात्रेदरम्यान समाजाची दिनदर्शिका विक्री, पुढील गावापर्यंत सहभागाची संधी, तसेच उपवर मुला–मुलींच्या ऑनलाईन बायोडाटाचे संकलन करून समाजोपयोगी उपक्रमांना चालना दिली जाणार आहे. ही पदयात्रा समाजाच्या आत्मपरीक्षणाचा व परिवर्तनाचा प्रवास ठरेल, असा विश्वास समाजातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केला आहे.
मराठा पाटील समाजातील प्रत्येक घटकाने या समाजसंवाद पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा योद्धा गजानन हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
