मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग दोन्ही बाजूने अडवला

विधानसभा निवडणुकीच्याआधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन

आता पुन्हा एकदा वातावरण तापताना दिसत आहे. मराठा नेते

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.

Related News

मनोज जरांगे यांची आता प्रकृती ढासळताना दिसत आहे. त्यांची

ही परिस्थिती पाहून मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत

आहेत. मराठा आंदोलकांनी आज अंतरवली सराटी गावापासून दीड

किलोमीटर अंतरावर वडीगोद्री गावाजवळ धुळे-सोलापूर महामार्ग

अडवला आहे. विशेष म्हणजे आंदोलकांमध्ये महिला आणि

मुलीदेखील आहेत. जवळपास तासाभरापासून आंदोलकांनी दोन्ही

बाजूने मार्ग रोखून धरला आहे. वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी

समाजाचे आंदोलक आमनेसामने आल्याच्या बातम्या सातत्याने

समोर येत होत्या. यानंतर आता मराठा समाजाचे आंदोलक थेट

रस्त्यावर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पोलीस आता

परिस्थिती कशी हाताळतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठा आंदोलकांकडून धुळे-सोलापूर महामार्ग अडवण्यात आला

आहे. जालन्याच्या वडीगोद्री येथे मराठा आंदोलक रस्त्यावर जमले

आहेत. त्यांनी महामार्ग रोखून धरला आहे. वडीगोद्री येथे ओबीसी

नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरु आहे.

तर दुसरीकडे दीड किलोमीटर अंतरावर मराठा नेते मनोज जरांगे

पाटील यांचं उपोषण सुरु आहे. जरांगे यांच्या उपोषणस्थळापासून

अवघ्या दीड किमी अंतरावर मराठा आंदोलक धुळे-सोलापूर

महामार्गावर एकत्र आले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/samsung-galaxy-5g-smartphone-in-big-billion-days-rs-9999/

Related News