भुवनेश्वर: लोकसभा निवडणूक सुरु असताना ओदिशामध्ये बीजू जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपकडून बीजदला फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर बीजदमध्ये सगळेच काही गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत, असं विधान भाजपचे नेते समीर मोहंती यांनी केलं. यानंतर बीजदच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘बीजू जनता दलामध्ये सगळेच काही गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत,’ असं विधान भाजप नेते समीर मोहंती यांनी केलं. बीजदचे नेते व्ही. के. पांडियन यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. ‘बीजदमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. भाजपनं विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० जागा जिंकल्यास त्यांच्याकडून राज्यातलं बीजद सरकार पाडण्यात येईल,’ असा खळबळजनक दावा पांडियन यांनी केला.
पांडियन यांच्या आरोपांना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष समीर मोहंती यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘मुख्यमंत्र्यांचे हाऊस मॅनेजर सेफॉलॉजिस्ट कधीपासून झाले? पांडियन मुख्यमंत्र्यांचे रिमोट कंट्रोल आहेत का?’ असे सवाल मोहंतींनी उपस्थित केले. ‘आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ५० जागा जिंकणार असल्याचं पांडियन खात्रीपूर्वक सांगत आहेत. मग ४ जूनला काय होणार हेदेखील त्यांना माहीत असेल,’ असा टोला मोहंती यांनी लगावला.
Related News
लोकसभा स्पीकर ओम बिरला यांच्या अध्यक्षतेखाली, बजेट सत्रादरम्यान अनुशासनभंगाच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या ८ विरोधी खासदारांचा निलंबन तात्काळ रद्द करण...
Continue reading
निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकींची घोषणा केली आहे. या पाच राज्यांमध्ये मतदानाचे वेळापत...
Continue reading
काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यातच अनेक नेते भाजपात प्रवेश
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा मोठा घमासान झाला आहे. काँ...
Continue reading
महाराष्ट्र भाजपमध्ये पक्षसंघटनेच्या मजबुतीसाठी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी १२ नव्या प्रदेश उपाध्यक्षांची घोषणा केली आहे. यामध्ये केशव उपाध्...
Continue reading
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
Continue reading
राहुल गांधींना आणि २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने केली तीव्र टीका
राजकारणात पुन्हा एकदा गंभीर वाद उद्भवला असून, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते
Continue reading
Zilla Parishad निवडणूक निकाल 2026: अजितदादांच्या शेवटच्या सभेतील उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला खेड तालुक्यात मोठं यश
Continue reading
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा बदल; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पक्षातील निर्णयांमध्ये नवा अध्याय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतेच एका दुःखद घडामोडीचा सामना ...
Continue reading
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री: राजकारणातील नवीन वळण आणि संजय राऊतांचा इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
‘बीजदमध्ये सगळेच गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत. ते आमच्या सतत संपर्कात आहेत. आपल्या पायाखालची जमीन सरकतेय याची बीजदला कल्पना आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष याआधीच या एकनाथ शिंदेंबद्दल बोलले आहेत. त्यात नवीन काहीच नाही,’ असं मोहंती म्हणाले. ओदिशा अस्मितेची जाणीव असलेले नेते जास्त काळ गुलाम म्हणून राहू शकणार नाहीत, असंही त्यांनी पुढे म्हटलं.