मान्सून लवकर येणार! महाराष्ट्रात १० जूननंतर पावसाची शक्यता

मान्सून लवकर येणार! महाराष्ट्रात १० जूननंतर पावसाची शक्यता

मुंबई, ८ मे २०२५ – महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले

असून नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबईतही दमट हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उष्माघाताचे प्रमाणही वाढत आहे.

Related News

अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेली ताजी अपडेट नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा नैऋत्य मान्सून आठवडाभर लवकर म्हणजेच १ जून रोजी केरळात

दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मान्सून ७ ते ८ जून दरम्यान केरळात येतो,

मात्र यंदा त्याचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत आहेत.

या अंदाजानुसार, महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये १० ते ११ जूनच्या दरम्यान पावसाचा पहिला शिडकावा होण्याची शक्यता आहे.

मान्सून कोकण किनारपट्टीवरून महाराष्ट्रात प्रवेश करत पुढे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विस्तारतो.

हवामान विभागाने सांगितले आहे की, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल.

यंदाचा २०२५ सालचा पावसाळा सामान्यपेक्षा जास्त पावसाचा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागानुसार, देशभरात सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडू शकतो. यामुळे जलाशयांमधील साठा वाढेल,

भूजल पातळी उंचावेल आणि शेतीसाठीही हा पाऊस फायदेशीर ठरेल.

Read Also : https://ajinkyabharat.com/indian-senella-virat-kohlicha-salute/

Related News