मनसेच्या हस्तक्षेपामुळे स्थानिकांना मिळाला न्याय व रोजगार

परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडली; मनसेच्या हस्तक्षेपामुळे स्थानिकांना मिळाला न्याय व रोजगार

अकोला | प्रतिनिधी

अकोला औद्योगिक क्षेत्रातील ADM अ‍ॅग्रो कंपनीच्या सुरक्षिततेसंदर्भातील कामगार प्रश्नावर गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेले

उपोषण अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपामुळे यशस्वीपणे संपुष्टात आले आहे.

Related News

स्थानिक सुरक्षा रक्षकांना नव्या कंपनीत पुन्हा सामावून घेण्याचे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आले.

घटना नेमकी काय होती?

दि. ८ एप्रिलपासून ADM अ‍ॅग्रो कंपनीने “सेफगार्ड” या जुन्या सुरक्षा कंपनीला हटवून, गुरगाव (हरयाणा)

येथील “पॅराग्रीन” कंपनीला नवीन कंत्राट दिले होते.

मात्र, मागील १० वर्षांपासून कार्यरत असलेले स्थानिक सुरक्षा रक्षक नव्या व्यवस्थेत वगळण्यात आले.

त्यामुळे या कामगारांनी कंपनी गेटवर उपोषण सुरु केले होते.

मनसेचा ठाम पवित्रा

कामगारांच्या व्यथा मनसे कार्यकर्त्यांपर्यंत पोहचताच, मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले,

शहर अध्यक्ष सौरभ भगत यांच्यासह संपूर्ण पदाधिकाऱ्यांची टीम तातडीने कंपनीत दाखल झाली.

त्यांनी कंपनीचे एच.आर. मॅनेजर चंद्रभूषण शर्मा यांच्याशी चर्चा करत, सर्व स्थानिक कामगारांना पुन्हा सामावून घेण्यास भाग पाडले.

तसेच, या निर्णयावर कंपनीकडून लेखी आश्वासनही घेतले.

यानंतर, पॅराग्रीन कंपनीचे संचालक गुरमीतसिंग यांच्यासह बैठक घेण्यात आली,

ज्यात त्यांनी सर्व सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेतले जाईल, अशी ग्वाही दिली.

नियुक्ती प्रक्रियाही तातडीने सुरु करण्यात आली.

कामगारांचा जल्लोष, मनसेचे आभार

हा संघर्ष यशस्वी ठरल्याने कामगारांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण दिसून आले.

त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

उपस्थित पदाधिकारी:

पंकज साबळे, सतीश फाले, सौरभ भगत, रणजित राठोड, शुभम कवोकार, मुकेश धोंडफळे,

अमोल भेंडारकर, मंगेश देशमुख, निलेश स्वर्गीय, सौरभ फाले (तालुकाध्यक्ष),

डॉ. प्रसन्न सोनार, निलेश आगरकर आदींची उपस्थिती होती.

Related News